Police Bharti 2024 : अमरावतीत पोलीस भरतीवर पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती; विद्यार्थी आक्रमक अन्..

| Updated on: Jun 24, 2024 | 1:31 PM

अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचं सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. हजारोच्या संख्येने महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीकरता आले आहेत. मात्र पावसामुळे मैदानी चाचणीचं मैदान चिखलानं भरलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचं सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री ३ वाजेपासून मैदानी चाचणीकरता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. पावसामुळे मैदान खराब असल्याने चिखलात सुरू असलेल्या मैदानी चाचणीला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. काल दुपारपासून अमरावतीत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर ज्या ठिकाणी मैदानी चाचणी होती ते मैदान पूर्णतः पावसाच्या पाण्याने आणि चिखलाने भरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हजारोच्या संख्येने महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीकरता आले आहेत. मात्र पावसामुळे मैदानी चाचणीचं मैदान चिखलानं भरलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र अमरावतीत ग्रामीण पोलीस भरतीच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीकरता प्रक्रिया सुरू केली आहे.

Published on: Jun 24, 2024 01:31 PM
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु; बघा व्हिडीओ
मनोज जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की देशाचा पंतप्रधान? कुणी केला थेट सवाल?