Amravati Rain: पावसाच्या सरी, धुक्याची चादर, पर्यटकांची गर्दी चिखलदरा फुललं!

| Updated on: Jul 15, 2022 | 11:37 AM

Amravati Rain: पर्यटकांनी भीमकुंड धबधबा पाहायला चांगलीच गर्दी केलीये. भीम कुंड (Bhim Kunda) धबधबा ओसंडून वाहतोय. चिखलदऱ्याने धुक्याची मस्त चादर ओढलीये.

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. इतका पाऊस की खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर देखील बंदी घालण्यात आलीये. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान अमरावतीच्या चिखलदऱ्याचं (Amravati Chikhaldara) सौंदर्य चांगलंच फुललंय! पर्यटकांनी भीमकुंड धबधबा पाहायला चांगलीच गर्दी केलीये. भीम कुंड (Bhim Kunda) धबधबा ओसंडून वाहतोय. चिखलदऱ्याने धुक्याची मस्त चादर ओढलीये. हिरव्या झाडीत, दरीखोऱ्यात धुकं दिसतंय. पर्यटक सुद्धा हे नयनरम्य दृश्य बघायला गर्दी करतायत.

 

 

Published on: Jul 15, 2022 11:37 AM
Nashik Waterfall | हिरवाईनं नटलेला धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधतोय
Satara: काय तो सुंदर लिंगमळा धबधबा!