मुख्याध्यापकाने शाळेतच विद्यार्थ्याचे केस कापले, Bad Touch केल्याचाही आरोप
मुख्याध्यापकाने शाळेतच सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगा रडत रडत घरी गेल्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. अमरावती शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला
अमरावती : मुख्याध्यापकाने (School Principal) शाळेतच विद्यार्थ्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील (Amravati Crime) नामांकित इंग्रजी शाळेत ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस शाळेत कापण्यात (Student Hair Cut) आले. मुख्याध्यापकाने सहा वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतच केस कापल्याचा आरोप आहे. तसंच त्याला नकोसा स्पर्श म्हणजेच “बॅड टच”ही केल्याचा दावा केला जात आहे. आरोपी मुख्याध्यापकाच्या विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुलासोबत घडलेल्या अश्लील घटनेचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनाही मुख्याध्यापकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.