Nawab Malik | अमरावतीत दंगली घडवण्यासाठी मुंबईतून पैसे आले, एका आमदाराने पैसे वाटले, मलिकांचा दावा

| Updated on: Nov 15, 2021 | 6:14 PM

नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही, असं मलिक म्हणाले.

इतकंच नाही तर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असंही ते म्हणाले.

Nagpur | नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू, सोशल मीडियावर भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्यास बंदी
Kishori Pednekar | कंगनाला पद्मश्री देऊन देशाचा अपमान : किशोरी पेडणेकर