Amravati Violence | तोडफोड, दगडफेक, लाठी चार्ज; अमरावतीमध्ये हिंसाचार

| Updated on: Nov 13, 2021 | 1:04 PM

आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले.

मुंबई:  आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.

Dilip Walse Patil | अमरावतीत घडलेल्या घटनामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार
नवी दिल्लीत प्रदूषणाचा कहर, नागरिक हैराण