Amruta Fadnavis Breaking | अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

| Updated on: Nov 11, 2021 | 4:48 PM

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणात रान उठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु केली आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणात रान उठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्सचा काळा धंदा सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केलाय. भाजपच्या अन्य नेत्यांवरही मलिकांनी आरोपांची मालिका सुरु केलीय. अशावेळी मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचंही मलिक म्हणाले होते. त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्स उद्योग चालत असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. हा आरोप करण्यापूर्वी मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. त्यात अमृता फडणवीस आणि जयदीप राणा पाहायला मिळत होते. जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासंदर्भात गायलेल्या गाण्याचं फायनान्स जयदीप राणा याने केलं होतं, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

Published on: Nov 11, 2021 03:56 PM
विलीनीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे, त्याला काही वेळ लागेल | Anil Parab
Chandrakant Patil | उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल