अनिल जयसिंघानीची सर्वोच्च न्यायालयात धाव, काय आहे कारण?

| Updated on: Apr 07, 2023 | 3:12 PM

VIDEO | अनिल जयसिंघानी याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात या दिवशी होणार सुनावणी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानीची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हणत दावा केला आहे. अनिल जयसिंघानी यांच्या याचिकेवर आता येत्या १४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना अनिल जयसिंघानीबाबतचे हे आदेश दिले आहेत.

Published on: Apr 07, 2023 03:12 PM
कोरोनावरून अजित पवारांची सरकरावर टीका; म्हणाले, हे सरकार…
IIT मुंबईमधील दर्शन सोळंकी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा खुलासा