अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड, बघा मोठी अपडेट

| Updated on: Mar 21, 2023 | 10:46 PM

VIDEO | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील धक्कादायक माहिती, अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना यापूर्वीच सांगितलं होतं....

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर करण्यात आल्यानं आणि धमकावल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली असून अनिक्षा २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. मुलगी अनिक्षा हिच्या अटकेनंतर वडील आणि फरार बुकी अनिल जयसिंघांनीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. गुजरातच्या कलोल इथून फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं. दरम्यान, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिक्षा जयसिंघानी हिने अमृता फडणवीस यांना बंद पाकिटातून बुकींची नावं आणि नंबर दिले होते. या बुकींना कारवाईची धमकी दिल्यास दोघांनाही आर्थिक फायदा होईल असे अनिक्षाने सांगितले होते, अशी माहिती समोर येत आहे.

Published on: Mar 21, 2023 10:46 PM
अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून शेतकरी आक्रमक, माघारी फिरताच ५० खोक्यांच्या घोषणा; पण का?
‘मातोश्रीची भाकरी अन् पवारांची चाकरी’, असं दादा भूसे यांनी म्हणताच अजित पवार भडकले