अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट, जयसिंघानियाच्या अडचणी वाढणार?
VIDEO | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात नवी अपडेट, मुंबईच्या विशेष पोलीस पथकानं घेतला पुढचा निर्णय
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. अमृता फडणवीस यांना लाच आणि खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई मलबार हिल पोलिसांनी गुरूवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल ७३३ पानांच्या या आरोपपत्रात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या आरोपपत्राविरोधात आणखी काही पुरावे आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी, अनिक्षाचा चुलत भाऊ निर्मल यांच्याविरोधात मुंबईच्या विशेष पोलीस पथकाने हे आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. या खुलास्यानंतर जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिलाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.