देवेंद्र फडणवीस यांच्या डॉक्टरेटवर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला लग्न झाल्यापासून…’

| Updated on: Aug 22, 2023 | 7:43 PM

VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट....अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांना आता पदवी दिली पण मला लग्न झाल्यापासून माहीत आहे की ते डॉक्टर आहेत, ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा जपानमधील कोयासन विद्यापीठाचे डीन श्री. सोएदा सॅन यांनी केली. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांना आता पदवी दिली पण मला लग्न झाल्यापासून माहीत आहे की ते डॉक्टर आहेत, ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत.”

Published on: Aug 22, 2023 07:40 PM
‘हे नामर्द सरकार, केवळ सत्तेसाठी…’, केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर कुणाचा हल्लाबोल?
विजयकुमार गावित यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अडचणी वाढणार? महिला आयोग काय करणार कडक कारवाई?