माझा स्पष्ट विरोध… शिंदे गटातील नेत्याच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

| Updated on: Aug 26, 2024 | 2:48 PM

'महिलांना पिस्तुल बाळगण्याची परवानगी द्या, त्यात दोन-चार चांगले मेले तरी हरकत नाही, मी पिस्तुल वाटपापासून ते कोर्ट कचेरीचा सारा खर्च करेल', असं वादग्रस्त वक्तव्य अमरावतीतील शिंदे गटाच्या एका नेत्यानं केल्याचे पाहायला मिळाले. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया?

Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा स्पष्ट विरोध आहे तर आत्मसंरक्षणासाठी महिलांनी शस्त्र वापरणं हा उपाय नाही असे अमृता फडणवीस म्हणाल्या. बदलापूरची जी घटना घडली ती दुःखद होती जे मानवरुपी दानव आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी मी पण विनंती करणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. तर महिलांनी आत्मसंरक्षण केलं पाहिजे आणि ते आवश्यक आहे. शस्त्र वापरणे याच्याविरोधात मी आहे. ते कायमचा पर्याय असू शकत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. समाजातील दानवी लोकांचा आपण बहिष्कार करायला हवा. अशा घटना घडल्या तर पोलिसांनी आणि सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवं. यासोबत आपल्या मुलांना आपण स्त्री शक्तीचा आदर करणे शिकवलं पाहिजे, हे जास्त सध्यस्थितीला आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.