अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त बैठकीवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये गुप्त बैठक, पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, 'कोण गुपचूप भेटतं माहिती नाही पण...'
पुणे, १२ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक झाली. पुण्यात झालेल्या या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनंतर आज प्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. एवढी तर मला आयडिया नाही कोण गुपचूप भेटतं. पण भेटणं कधीही चांगलं, गुपचूप भेटा किंवा सर्वांपुढे भेटा, प्रेमानं भेटा ही सगळ्यात चांगली गोष्ट आणि भेटत राहा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.