बारामतीत सुनेत्रा पवारच लढणार लोकसभा? घोषणा नाही तरी जंगी प्रचाराला सुरूवात

| Updated on: Mar 20, 2024 | 1:08 PM

बारामती लोकसभेच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच असणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आलाय. पुण्यातील खडकवासला येथील बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मत देण्याचं आवाहन

बारामती, २० मार्च, २०२४ : बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. अशातच बारामती लोकसभेच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच असणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आलाय. पुण्यातील खडकवासला येथील बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मत देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महायुतीच्या या बॅनरवर खडकवासल्यातून १ लाखांहून अधिक मताधिक्य देण्याचा उल्लेख करण्यात आलाय. सुनेत्रा पवारांच्या नावाची अद्याप महायुतीकडून घोषणा झाली नसली तरी प्रचार मात्र सुरू झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असल्या तर मतदार किती साथ देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Mar 20, 2024 01:08 PM
गेल्यावेळचा कोल्हापुरातील ‘ठरलंय’ फॅक्टर यंदा माढ्यात? मोहिते भाजपविरोधात तुतारी फुंकणार?
निवडणुका आल्यावर ‘मनसे’ची सेटिंग सुरू होते, कुणाचा हल्लाबोल?