Pune | राज्य सरकारच्या मंदिरे सुरु करण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी बिघडली आहे..पण मंदिर सुरू करण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी बिघडली आहे..पण मंदिर सुरू करण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.घटस्थापनेला मंदिर उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्या नंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर भाविकांसाठी खुल होत आहे.त्या साठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून सकाळी 6 ते 8 या दरम्यान भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिर खुले झाले तरी गाभाऱ्यात मात्र भाविकांना जाता येणार नाही. मंदिर ठराविक अंतराने निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी मंदिर परिसरातल्या व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत…