ईडीचा धाक दाखवून १६४ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न, नेमकं प्रकरण काय?
ईडीच्या नावाने व्यवसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचा टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुख्य आरोपी हिरेन भगत याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाठ, राकेश केडिया, कल्पेश भोसले, अमेय सावेकर आणि हिरेन भगत यांचा समावेश
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : ईडीचा धाक दाखवून ओंकार डेव्हलपर्सकडून १६४ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ६ जणांना अटक केली. या ६ जणांची चौकशी सुरू असताना धक्कादायक खुलासे समोर आलेत. ईडीच्या नावाने व्यवसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचा टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुख्य आरोपी हिरेन भगत याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाठ, राकेश केडिया, कल्पेश भोसले, अमेय सावेकर आणि हिरेन भगत यांचा समावेश आहे. हिरेश भगतची चौकशी सुरू असताना पोलिसांना आरोपी हिरेन भगतच्या घरातून एमपी-५ मशिनगन सापडली. याचा वापर डिफेन्स फोर्सकडून खास ऑपरेशनसाठी होतो. हीच गन हिरेन भगतकडे कशी आली याचा तपास सध्या सुरूये. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट