Mumbai | मुंबईतील महाकाली दर्शन सोसायटीत 10व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून मुंबईत भीषण अपघात (Mumbai Lift Accident) झाला. अंधेरी पूर्व भागातील (Andheri East) बहुमजली इमारतीत (Tall Building) हा प्रकार घडला. या अपघातात पाच रहिवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

पाच जण गंभीर जखमी
मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील गावठाण भागात आझाद रोडवर गुंदवली बस स्टॉपच्या समोर असलेल्या महाकाली दर्शन सोसायटीत (Mahakali Darshan Society) हा अपघात झाला. एसआरए प्रकल्पा अंतर्गत उभारलेली ही 16 मजली इमारत आहे. लिफ्ट 10 व्या मजलावरुन खाली कोसळून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
आज (सोमवारी) दुपारी बारा वाजून 52 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस सुद्धा घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले आहे.