वसईच्या समुद्रातील धार्मिक एकोपा जपणारं ‘ते’ बेट चर्चेत, बेटावर ३ धार्मिकस्थळं एकत्र
VIDEO | वसईच्या समुद्रातील 'त्या' बेटावर हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन तीन धर्मांचा एकोपा, बघा व्हिडीओ
वसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील सभेनंतर राज्यातील अनधिकृत दर्गे, मशिदींचा विषय चर्चेत आला होता. मात्र वसईच्या समुद्रातील एका बेटावर तीन धार्मिकस्थळ एकत्र असल्याचे पाहायला मिळाले आहे. वसईच्या समुद्रात पोशावीर नावाचं बेट आहे. या बेटावर तीन धार्मिकस्थळ एकत्र असून धार्मिक एकोपा जपणारं बेट म्हणून सध्या त्याची चर्चा सुरू आहे.या बेटावर मुस्लिमांचा दर्गा, हिंदूंचा पवनपुत्र हनुमानाचा पूर्ण पुतळा आणि ख्रिश्चन धर्मियांचा क्रॉस आहे. पोशापिर बेट येथे हजरत सय्यद पीर गौश आली शहा कादरी, गोशापिर बाबा (पोशापिर) यांचा दर्गा आहे. तिन्ही धर्मातील लोकं या ठिकाणी येऊन रितीरिवाजाने पूजा अर्चना करण्यासाठी येत असतात. वसई किल्लाबंदर कस्टम जेटीपासून जवळपास 2 नॉटिकल अंतरावर पोशापिर हे निर्मानुष्य बेट आहे. या बेटाचे अंदाजे क्षेत्रफळ 15750 स्क्वेअर मीटर एवढे आहे.