राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?

| Updated on: Apr 18, 2024 | 12:21 PM

भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि रवी राणा हे महायती, राजकारणातील कट्टर विरोधक आनंद अडसूळ यांच्या घरी आलेत. ज्यावेळी राणा दाम्पत्य अडसूळांच्या घरी आलेत तेव्हा आनंद अडसूळ घरी नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिजित अडसूळांना त्यांचं स्वागत केलं.

अडसूळ पिता-पुत्रांचा विरोध पाहता स्वतः राणा दाम्पत्याने अडसूळांच्या घरी दाखल होत भेट घेतली. यावेळी अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्प्त्याचे स्वागत केले. मात्र स्वतः आनंद अडसूळांना राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही, अशी थेट भूमिकाच त्यांनी मांडली. अमरावतीकरच नाही तर सर्वच अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी ही दृश्य आश्चर्यचकीत करणारी आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि रवी राणा हे महायती, राजकारणातील कट्टर विरोधक आनंद अडसूळ यांच्या घरी आलेत. ज्यावेळी राणा दाम्पत्य अडसूळांच्या घरी आलेत तेव्हा आनंद अडसूळ घरी नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिजित अडसूळांना त्यांचं स्वागत केलं. जवळपास अर्धातास रवी राणा आणि नवनीत राणा हे अडसूळांच्या घरी होतं. याभेटीनंतर अभिजित अडसूळांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राजकारणात कोणीच कायमस्वरूपी कुणाचं शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हणत पाठिंब्याचे संकेत दिलेत. बघा काय म्हणाले अभिजित अडसूळ?

Published on: Apr 18, 2024 12:21 PM