अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? मुस्लीम सरदारांची नावं ट्वीट केल्यानं कोणी केली मागणी?
शिवरायांसोबत मुस्लिम नव्हते असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले. त्यानंतर अमोल मिटकरींनी मुस्लिम सरदारांची यादीच जाहीर केली. मात्र अशा प्रकारे शिवरायांना सेक्युलर करण्याचा पाप झाला असून मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आनंद दवे यांनी केली.
नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीही मुस्लमान नव्हते. असं वक्तव्य केल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत प्रमुख पदावरील यादी जाहीर केली. अमोल मिटकरींनी महाराजांसोबत मुस्लिम कसे होते याची यादी समोर आल्यावर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी मिटकरींवरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाजी महाराजांना सेक्युलर करण्याचं पाप केल्याचं दवे यांनी म्हटलं. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा मिटकरींचा इतिहास कच्चा असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मात्र महाराजांची लढाईच इस्लाम विरोधी होती आणि कोणीही महाराजांसोबत मुसलमान नव्हते असं वक्तव्य करून नितेश राणे यांनी नवाच वाद निर्माण केला. तर महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचं काम सुरू असून महिन्याभरात दंगली होतील अशी गंभीर शंका जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट