शिंदेंच्या पुत्राविरोधात आनंद दिघेंचे पुतणे कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

| Updated on: Mar 24, 2024 | 11:49 AM

श्रीकांत शिंदेंविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट मिळण्याची शक्यता... कल्याण लोकसभेत शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच नाव जवळपास निश्चित झालंय तर ठाकरे गटाकडून केदार शिंदे यांच्या नावाची चर्चा जोरदार होतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? यावर बरेच दिवस चर्चा होती. या चर्चेतून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं नाव पुढे येतंय. कल्याण लोकसभेत शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच नाव जवळपास निश्चित झालंय तर ठाकरे गटाकडून केदार शिंदे यांच्या नावाची चर्चा जोरदार होतंय. मात्र ठाकरे यांची शिवसेना विरूद्ध शिंदेंची शिवसेना यांच्या लढतीपेक्षा कल्याण मतदार संघ स्थानिक गटबाजी आणि अजित पवार गटाच्या भूमिकेमुळे चर्चेत राहिला आहे. कारण स्थानिक भाजपने कल्याणच्या जागेवर दावा सांगितलाय. तर बारामतीच्या जागेवरून शिवतारेंच्या भूमिकेमुळे ठाण्यातील अजित पवाराच्या गटानेही इशारा दिलाय. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं कसं आहे कल्याण लोकसभेचं गणित, काय सांगतात आकडे?

Published on: Mar 24, 2024 11:49 AM