गणपती देखाव्यात आनंद दिघेंचं आश्रम!
घरात बसविले जाणारे बाप्पासुद्धा त्यांचा थाट मंडळाच्या गणपतींपेक्षा कमी नसतो. एका घरातल्या गणपतीसाठी चक्क आनंद दिघेंच्या आश्रमाचा देखावा उभा करण्यात आलेला आहे.
गणपती उत्सव (Ganesh Festival) मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. घरात बसविले जाणारे बाप्पासुद्धा त्यांचा थाट मंडळाच्या गणपतींपेक्षा कमी नसतो. एका घरातल्या गणपतीसाठी चक्क आनंद दिघेंच्या (Anand Dighe) आश्रमाचा देखावा उभा करण्यात आलेला आहे. हा देखावा इतका सुंदर आहे की हुबेहूब आश्रम (Anand Dighe Ashram)असल्याचा भास होतो.
Published on: Sep 04, 2022 11:55 AM