गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर अजित पवार गटातील नेत्याचं प्रत्युत्तर, महायुतीत मिठाचा खडा…
VIDEO | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांना पुन्हा डिवचलं आहे. STD यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, एकदिवस तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायच सोडून द्या, असा सल्ला पडळकरांनी दिला होता. यावर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांचे प्रत्युत्तर
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांना पुन्हा डिवचलं आहे. किती दिवस तुम्ही STD च्या नादात गुरफटणार. STD म्हणजे साहेब, ताई आणि दादा. STD यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, एकदिवस तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायच सोडून द्या, असा सल्ला देत पडळकरांनी चांगलंच फटकारलं आहे. यावर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संपूर्ण १३० करोड भारतीयांना संविधान डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला आम्ही महत्त्व देत नाही. त्याच्या वक्तव्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दादांची दोनदा माफी मागावी लागली आहे. टीका जरूर करावी, पण टीका करण्याची मर्यादा आणि शैली असते. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम जर गोपीचंद पडळकर यांना करायचे असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जास्त लक्ष दिले पाहिजे. पडळकर यांना मीठाचा सप्लाय होत असेल तर त्यावर त्यांनी नियंत्रण केलं पाहिजे.