Video | रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक – आनंदराज आंबेडकर

| Updated on: Dec 27, 2021 | 11:55 PM

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले.

पुणे:  रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर घणाघाती टीका केली. आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत, असं आनंदराज म्हणाले. तसेच आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत सरकार ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा आरोप केला. ओमिक्रॉनचा धोका जास्त नसल्याने या वर्षीचा शौर्य दिन हा लाखोंच्या संख्येच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं सांगतानाच कोरोना हा अजिबात गंभीर विषाणू नाही. त्यामुळे भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या असं आवाहन त्यांनी केलं.

Published on: Dec 27, 2021 11:55 PM
sudhir mungantiwar | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा