अनंत अंबानींच्या शाही लग्नात खास पाहुण्यांना 2 कोटींचं रिटर्न गिफ्ट घड्याळ, नेमकं काय आहे खास?
विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दोन कोटींची घड्याळं देण्यात आली आहे. शहारूख खान, रणबीर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांच्या हातात हे महागडं घड्याळं पाहायला मिळालं. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला देशविदेशातील राजकीय नेते, चित्रपटसृष्टी, क्रिडा विश्वातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दोन कोटींची घड्याळं देण्यात आली आहे. शहारूख खान, रणबीर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांच्या हातात हे महागडं घड्याळं पाहायला मिळालं. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला देशविदेशातील राजकीय नेते, चित्रपटसृष्टी, क्रिडा विश्वातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. तर यांना कोट्यावधी रूपयांचे रिटर्न गिफ्ट देण्यात आल्याचा दावा इंडीयन होरोलॉजी पेजने केला आहे. Audemars piguet या लक्झरियस ब्रँडची घड्याळं रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यात आली. ही घड्याळ १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली असून यामध्ये खास क्रिस्टल आहेत. या घड्याळ्याची किंमत २ कोटी ८ लाख ७९ हजार इतकी आहे. १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका हे लग्न बंधनात अडकले. यादिवशी पंतप्रधान मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदेही या सोहळ्याला हजर होते. बघा या शाही विवाह सोहळ्याच्या काही क्षणांचा स्पेशल रिपोर्ट