राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 24, 2023 | 1:00 PM

VIDEO | 'या' प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, काय दिले न्यायालयाने निर्देश, बघा व्हिडीओ

मुंबई : अनंत कसमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे. तीन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे करमुसे यांनी सांगितले.

Published on: Feb 24, 2023 12:48 PM
‘आगलावे’ तुमचं ‘संतुलन’… शिवसेना आमदाराचा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल
शिंदे गटाने कायदा काय घरात नाचायला ठेवलाय का? संजय राऊत यांचा खोचक सवाल