अंधेरीत बांधकाम सुरु असणारी चारमजली इमारत कोसळली, पाच जणांची ढिगाऱ्याखालून सुटका

| Updated on: Jul 28, 2021 | 10:01 AM

मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं. या घरांच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते.

मुंबईत बांधकाम सुरु असणारी चारमजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत वाचवले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असं 4 मजल्याच्या घराचं बांधकाम सुरु असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळलं. या घरांच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते. त्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये रेस्क्यू केले. या 5 जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार,खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले
Viral Video | एकाच वेळी रस्ता ओलांडणारा 3 हजार हरणांचा कळप, वेलावदारमधील मनोहारी दृश्य