त्यांना अडकवण्याचा डाव, फडणवीसांकडून ऑफर होती अन्…अनिल देशमुख यांच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Jul 28, 2024 | 1:15 PM

देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन येणाऱ्या समित कदम याच्याशी झालेल्या संवादाचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी हा दावा करताना टाईम्स ऑफ इंडियाला अशी माहिती दिली आहे. तर अनिल देशमुख यांनी केलेल्या या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे.

ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफर होती, असं अनिल देशमुख म्हणालेत. इतकंच नाहीतर समित कदम नावाचा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आला होता, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन येणाऱ्या समित कदम याच्याशी झालेल्या संवादाचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी हा दावा करताना टाईम्स ऑफ इंडियाला अशी माहिती दिली आहे. तर अनिल देशमुख यांनी केलेल्या या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे. अनिल देशमुख यांना पुरावे, देऊ द्या, माझ्याकडील क्लिपदेखील मी उघड करेन, असं वक्तव्य करत अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांनी इशाराच दिला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टाईम्स ऑफ इंडियाला ही प्रतिक्रिया दिली. मात्र या प्रकरणावर समित कदम यांचा बोलण्यास नकार आहे.

Published on: Jul 28, 2024 01:15 PM
पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ
पुणेकरांनो सावध राहा… पुणे परत पाण्याखाली? खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाणी सोडणार