अनिल देशमुखांचे दावे कायम अन् ‘त्या’ व्यक्तीचं नाव जाहीर, देवेंद्र फडणवीसांचं आता ‘लाव रे तो व्हिडीओ’?

| Updated on: Jul 29, 2024 | 10:39 AM

देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्याबद्दलच्या आरोपांवर आणखी एक गौप्यस्फोट केलाय. आरोपांनुसार देवेंद्र फडणवीस यांनी जी व्यक्त पाठवली होती. त्या व्यक्तीचं नाव टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत जाहीर केलंय. अनिल देशमुख म्हणाले...

समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवलं असं थेट नाव घेत नव्या दाव्यांचा सिलसिला सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्याबद्दलच्या आरोपांवर आणखी एक गौप्यस्फोट केलाय. आरोपांनुसार देवेंद्र फडणवीस यांनी जी व्यक्त पाठवली होती. त्या व्यक्तीचं नाव टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत जाहीर केलंय. देशमुख म्हणाले, काही प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांनी पाठवला होता. फडणवीसांना तुमच्याशी बोलायचं म्हणून तो म्हणाला. त्यांनं माझं फडणवीसांशी बोलणं करून दिलं. त्यानं सोबत आणलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे, अजित पवार , आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप होते. त्यावर गृहमंत्री म्हणून मी स्वाक्षरी केली असती तर ते चारही नेते अडकले असते. त्यामोबदल्यात मला ईडीच्या कारवाईपासून मुक्त करण्याची ऑफर फडणवीसांची होती… बघा आणखी काय म्हणाले अनिल देशमुख?

Published on: Jul 29, 2024 10:39 AM
Pro Govinda 2024 : ठाण्यात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन, हजारो गोविंदांची हजेरी, कुठे-कधी होणार फायनल?
वेशांतर अन् सत्तांतर…सत्तेत जाण्याआधी काय घडलं? अजितदादांनी उघडली सत्तेची सिक्रेट फाईल