Anil Deshmukh | अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुखांना ईडीचा समन्स, 2 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. विशेष म्हणजे ईडीने देशमुख यांना यापूर्वी तीनवेळा समन्स पाठवले आहेत. गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत ईडी चौकशी टाळली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ईडीने देशमुख यांना समन्स पाठवले आहेत. या समन्सनुसार देशमुख यांना 2 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखव व्हावं लागेल.