‘तुम्ही 15 दिवस शांत का? आता तुम्हाला आठवलं…’, देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुखांचा सवाल
Anil Deshmukh Tweet of Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तुम्ही 15 दिवस शांत का होता? आता माझ्यावर आरोप करायचे तुम्हाला आठवले का? सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.
‘वा… देवेंद्र फडणवीस! तुम्ही 3 वर्षापूर्वी कसे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे आणि परमवीर सिंग अशा आरोपींना पुढे केले आहे. आता दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे.’, असे अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. तर आम्ही परमवीर सिंगला 3 वर्षापूर्वी निलंबित केले होते. त्याला 3 वर्षापूर्वी केंद्रीय एजन्सीकडून अटक होणार होती. पण तो भाजपाला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करीत आहे’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होता? आता माझ्यावर आरोप करायाचे तुम्हाला आठवले काय? असा सवालही अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.