Kirit Somaiya | दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, किरीट सोमय्यांचा दावा
दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यावरही सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चं रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचं कनेक्शन घेतलं. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.