Anil Parab PC LIVE | जनतेला वेठीस धरणं योग्य नाही, अनिल परबांचं एसटी कामगारांना चर्चेचं आवाहन

| Updated on: Nov 09, 2021 | 3:21 PM

कोर्टान सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असं अनिल परब म्हणाले. विलीनीकरणाच्या मागणीचा निर्णय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे कमिटीचं करेल,असं अनिल परब म्हणाले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. एसटीचा संप सुरु आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पर्यायी व्यवस्था करतोय. ज्या 3 मागण्या आहेत त्या मान्य केल्या गेल्या होत्या.मात्र, विलीनीकरणासंदर्भात नवी मागणी केलीय. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केलीय.ही समिती पुढील विचारविनीमय करेल. इंडस्ट्रियल कोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे, असं जाहीर करुनही हा संप सुरु आहे. कोर्टान सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असं अनिल परब म्हणाले. विलीनीकरणाच्या मागणीचा निर्णय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे कमिटीचं करेल,असं अनिल परब म्हणाले.

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना होस्टेज चालवलं, नवाब मलिकांचा आरोप