मग आता सभा घेऊन कुणाचं पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?

| Updated on: May 01, 2024 | 5:32 PM

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होते. त्यामुळे मनसे आता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय. अशातच अनिल परब यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. बघा अनिल परब यांनी राज ठाकरेंवर काय केली सडकून टीका?

दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून केलं होतं. या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होते. त्यामुळे मनसे आता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय. अशातच अनिल परब यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ‘सऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते, मग आता सभा घेऊन कुणाचे पोरं खेळवणार?’, असा सवाल करत अनिल परब यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही, मग राज ठाकरे कुणाचा प्रचार करणार आहेत? असेही अनिल परब म्हणाले आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

Published on: May 01, 2024 05:32 PM
किरण सामंतांची आपल्याच भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर, फोटो हटवले
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?