ईडी नोटीसनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Aug 29, 2021 | 9:16 PM

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसवर परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या नोटीसला आपण कायदेशीर उत्तर देऊ, असंही ते म्हणाले.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसवर परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  “आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

Published on: Aug 29, 2021 09:15 PM
Eknath Khadse | कर नाही तर डर कशाला, ईडी चौकशीला सामोरं जातोय : एकनाथ खडसे
Special Report | नारायण राणेंचा शिवसेनेशी संघर्ष, आता अजित पवारांकडे मोर्चा!