Anil Parab यांना साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, काय दिले निर्देश?
VIDEO | दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई हाय कोर्टाकडून दिलासा, या प्रकरणावरून कोणतीही सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ | दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई हाय कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कायम असल्याचे मुंबई हायकोर्टाकडून सांगण्यात आले आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील कोणतीही सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ईडीने दाखल केलेला ईसीआयआर रद्द करण्यासाठी अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता या प्रकरणावरील सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ही सुनावणी तहकूब असेपर्यंत आणि पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.
Published on: Sep 06, 2023 12:36 PM