एसटी कर्मचारी आणि जनतेच्या हितासाठी मध्यम मार्ग काढण्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा: अनिल परब

| Updated on: Nov 22, 2021 | 4:52 PM

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेले काही दिवस एसटीचा संप सुरु असल्याचं म्हटलं. एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील लोकांचं आणि शाळेत जाणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतं आहेत. शरद पवार यांनी अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली, असं अनिल परब म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेले काही दिवस एसटीचा संप सुरु असल्याचं म्हटलं. एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील लोकांचं आणि शाळेत जाणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतं आहेत. शरद पवार यांनी अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करणं, एसटी भविष्यात कशी रुळावर येईल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आताच्या मागण्या यासंदर्भात चर्चा केली. सध्याच्या प्रश्नातून मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान कसं करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली, असं अनिल परब म्हणाले. विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानं नेमलेल्या समितीकडून अहवाल येईल. त्या समितीपुढं कोणती बाजू मांडायची यासंदर्भात चर्चा झाली. विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर राज्यांमधील कर्मचाऱ्यांचं वेतन यासंदर्भात चर्चा झाली. वेतनवाढ कशी देता येईल यासंदर्भात चर्चा झाली, असं अनिल परब यांनी सांगितलं.

चर्चेला व्यवस्थेत योग्य स्वरुप आल्यानंतर पुढं सांगितलं जाईल. हायकोर्टाच्या समितीचा अहवाल यायला वेळ लागणार आहे. त्यामुळं कोणीही ठाम भूमिका घेऊन चालणार नाही. एसटी कर्मचारी आणि जनतेच्या हिताचा मध्यममार्ग काढण्याचा निर्णय घेतला जाईल. वेगवेगळे मार्ग आहेत. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत अधिक माहिती सांगता येणार नाही. एसटीच्या प्रश्नी कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा होईल, असंही अनिल परब म्हणाले.

Ratnagiri | अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्रामध्ये पोहण्यास बंदी
Gunratna Sadavarte | एसटीचं विलीनीकरण करणार की नाही ते सांगा: गुणरत्न सदावर्ते