Anil Parab | गोपीचंद पडळकर यांनी गरज असेल तर सुरक्षा देणार : अनिल परब

| Updated on: Nov 18, 2021 | 8:51 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. फडणवीसांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पडळकर हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना गरज असेल, त्यांच्या जीवाला धोका असेल तर राज्य सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.

फडणवीसांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पडळकर हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना गरज असेल, त्यांच्या जीवाला धोका असेल तर राज्य सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Murlidhar Mohol | पुण्यात कुठलीही पाणी कपात नाही, अमित शहांचा दौरा नियोजित वेळेप्रमाणे
Special Report | एसटी संपाच्या लढ्यात उद्या मोठा दिवस ?