Anil Parab यांनी वांद्र्यातून निवडणूक लढवून दाखवावी- Ramdas Kadam
शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच रामदास कदम यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अनिल परब यांचा बाप काढतानाच त्यांना हरामखोर म्हणूनही हिणवले. मी किरीट सोमय्यांना कधीच भेटलो नाही. त्यांना कोणतेही कागदपत्रं दिली नाहीत. पण माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यामागे अनिल परब यांचा हात असल्याचं सांगतानाच अनिल परब हे साधं निवडून येऊ शकत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवावं, असा जोरदार हल्ला कदम यांनी चढवला.