अब की बार 400 पार की तडीपार? महायुतीला महाराष्ट्रात किती जागा? अनिल थत्ते यांनी काय केली भविष्यवाणी?

| Updated on: May 28, 2024 | 1:32 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात कुणाची हवा राहणार... महाविकास आघाडी की महायुती? याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच अनेक बडे राजकीय विश्लेषक आपला आपला अंदाज व्यक्त करत आहे. महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार याबाबत आता अनिल थत्ते यांनी भविष्यवाणी केली

Follow us on

देशात ४ जूनला कोणाचं सरकार बनणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात कुणाची हवा राहणार… महाविकास आघाडी की महायुती? याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच अनेक बडे राजकीय विश्लेषक आपला आपला अंदाज व्यक्त करत आहे. महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार याबाबत आता अनिल थत्ते यांनी भविष्यवाणी केली आहे. 35 ते 40 जागा महायुतीला मिळतील, म्हणजेच 8 ते 15 जागा महाविकासआघाडीला मिळतील, असा माझा अंदाज आहे. महाआघाडीने प्रचारात घेतलेले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले. महायुतीला बहुमत मिळाले तर ते संविधान बदलतील आणि आपल्या समाजात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दल नातं जपलेले अनेक लोकं आहेत. त्यामुळे ते लोक विचलित झाले त्यात महाविकास आघाडीली यश मिळवतील यासह दुसरी गोष्ट म्हणजे संविधानाबरोबरच हुकुमशाही देखील येऊ शकते आणि तसं झालं तर ती हुकूमशाही मुस्लीमांविरोधात असले. त्यामुळे मुस्लीम वर्ग आणि दलित वर्ग दुखावला गेला आहे. तर महायुतीने केवळ मोदींचा चेहरा हा एकच मुद्दा मांडला आहे. महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये इतर राज्यांमध्ये दिसतो तेवढा कडवटपणा महाराष्ट्रात नाही. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रात फार चालेल असं मला वाटत नाही, असेही थत्ते यांनी स्पष्टपणे सांगितले.