भाई ये Google से कम नही… 2000 प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ, अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याची कमाल, कोण आहे हा गुगुल बॉय?

| Updated on: May 26, 2024 | 5:19 PM

अनिशचे वय सहा वर्षे आहे. तो अवघ्या २ वर्षांचा होता, तेव्हा नागपुरला आजीकडे राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने शहर बदलावे लागतं असल्यामुळे अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडे नागपूरला राहायला आल्या. तो अंतराळसंबंधीच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांचा अबोल बालकाची अंतराळाविषयीची रुची थक्क करणारी होती

6 वर्षाचा बालक म्हटलं की त्याचे बोबडे बोल, त्याच खेळणं आणि मस्ती या सगळ्यांना आनंद देतात. मात्र नागपुरात 6 वर्षाचा असा चिमुकला आहे, त्याला गुगल बॉय म्हटलं तर वावग ठरणार नाही… अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्याने स्पेस सायन्स, रॉकेट, जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर, जगातील अनेक देशांचे चलनासह अनेक विषयांचे सखोल ज्ञान अर्जित केले आहे. अनिशची अनेक विषयावरील दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ झाली आहेत अनिशला अंतरिक्ष आणि अंतराळवीरांच्या बाबतीत सर्वाधिक रुची आहे. त्यामुळे त्याला स्पेसच्या संदर्भातील पाचशे (फॅक्ट्स) तत्थ माहिती आहे. अनिश नेत्रदीपक यशामागे त्याची आजी स्मिता पंडित यांचे विशेष योगदान आहे. स्मिता पंडित यांनी कर्करोगाशी लढत असताना अनिशवर केलेल्या संस्कारामुळे तो आज अवघ्या सहाव्या वर्षी गुगल बॉय म्हणून नावारूपाला येत आहे, बघा व्हिडीओ

Published on: May 26, 2024 05:19 PM
योगी को बचाना है, तो मोदी को… ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी काय केले मोठे दावे?
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच शशिंकात शिंदेंच्या विजयाचे झळकवले बॅनर