Anjali Damania Video : धनंजय मुंडे अडचणीत? दमानियांनी वाचला कृषी खात्यातील भ्रष्टचाराचा पाढा, ‘इतक्या’ कोटींच्या घोटाळ्यांचा गौप्यस्फोट
आता नॅनो डीएपी, याची किंमत ५२२ रुपये एक लिटर. म्हणजे ५०० मिलिलीटरला ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये. कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी घाई-घाईने स्वाक्षरी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्यांचा गंभीर आरोप केला. अंजली दमानिया यांनी मंगळवारी ११ वाजता पत्रकार परिषद घेत पुराव्यानिशी त्यांच्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला. अंजली दमानियांच्या या गौप्यस्फोटामुळे कृषी विभागाची अब्रू वेशिला टांगली गेल्याचे पाहायला मिळाले. या गौप्यस्फोटानंतर दमानियांनी आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही? असा थेट सवाल सरकारला केला. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळाच घोटाळ झाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भ्रष्टाचार म्हणतो, पण तो किती पट झाला हे दिसेल. या सर्वांचे दर दाखवते. नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो युरिया १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ५०० रुपये मिळतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या, असा आरोप दमानिया यांनी केला.