Anjali Damania : ‘सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली…’, अंजली दमानियांनी डिवचलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आल्या. दरम्यान, चार महिन्यांनंतर मारेकऱ्यांनी कबुली जबाब देत संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. यावर दमानियांनी भाष्य केलेय.
‘जेव्हा जेव्हा नेत्यांच्या गोष्टी बाहेर येतात तेव्हा तेव्हा त्यांची दाढी पांढरी होताना दिसते’, असं म्हणत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुरेश धसांना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. अजंली दमानिया यांना सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. या घटनेनंतर सुरेश धसांची भूमिका काहिशी बदलली असे वाटते का? असा सवाल केला असता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख केला. अंजली दमानिया म्हणाल्या, ‘छगन भुजबळ हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या छातीत कळ आल्याचे पाहायला मिळाले. नंतर आता त्यांना कधीच दिसलं नाही. तसंच सतीश भोसले याच्या घरावर कारवाई झाल्यानंतर त्याची प्रकरणं बाहेर आल्यानंतर आता सुरेश धसांची दाढी पांढरी झाल्याचे दिसतेय. याआधी कधीही सुरेश धसांची दाढी पांढरी झाल्याचे किंवा वाढल्याचे दिसले नाही’, असे अंजली दमानिया म्हणाल्या. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांनी दिलेल्या कबुली जबाबावर अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केले आहे.