… अन् फर्नांडीस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय, अंजली दमानिया यांचा काय होता भुजबळांवर गंभीर आरोप?

| Updated on: Jan 02, 2024 | 4:40 PM

दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबाची जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फसवणुकीचे आरोपही केले होते. दरम्यान २० वर्षांनंतर फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी म्हटले

मुंबई, २ जानेवारी २०२३ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबाची जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फसवणुकीचे आरोपही केले होते. दरम्यान २० वर्षांनंतर फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. याप्रकरणावर बोलताना अंजली दमानिया असे म्हणाल्या, ‘डोरीन फर्नांडिस यांचे ८.५० करोड रुपये छगन भूजबळ यांनी २० वर्ष दिले नव्हते, पण आज त्यांना ते द्यावे लागले. डोरीनचा बंगला भुजबळांच्या परवेज कंस्ट्रक्शनने डीमोलिश केला, मात्र एक दिड दमडी त्यांना दिली नव्हती. मात्र आज २० वर्षानंतर हे पैसे मिळाले, राजकारणी निर्दयी आणि अमानुष आहेत. छगन भूजबळ हे निर्दयी आणि अमानुष राजकारणी आहेत. अनेक वेळा समजावूनही त्यांनी ऐकले नाही, जानेवारी २००८ ला ठरलं की पैसे द्यायचे पण नंतर इडीच्या दबावामुळे त्यांना देता येत नाही असं कारण दिलं’, असे त्यांनी म्हटले.

Published on: Jan 02, 2024 04:40 PM
स्वाभिमानीचे राजू शेट्टी ‘मविआ’त जाणार की नाही? थेट सांगितलं भेटीत नेमकं काय झालं?
जपान एअरलाईन्सच्या विमानाचा बर्निंग थरार, विमानात 300 हून अधिक प्रवासी अन्… भडकली आग