धनगर समाजाच्या उपोषणकर्त्याची १२ व्या दिवशी तब्येत खालावली अन् दिला इशारा, ‘आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…’

| Updated on: Sep 17, 2023 | 2:22 PM

VIDEO | गेल्या १२ दिवसांपासून अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजास आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्यानंतरही उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम

Follow us on

अहमदनगर, १७ सप्टेंबर २०२३ | अहमदनगरला चौंडी येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसापासून चौंडी येथे उपोषण आंदोलन सुरू आहे. तर बाराव्या दिवशी आंदोलकांची तब्येत खालवली असून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तर सुरेश शिवाजीराव बंडगर यांना कुपोषण स्थळावरच सलाईन लावून वैद्यकीय उपचार सुरू आहे. तर कालच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी काही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी महाजन यांनी उपोषण कर्त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिली आहे. मात्र आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी येथे गेल्या १२ दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्यांची भेट घेतली.