गोकुळ दुध संघाच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच महाडिक गटाची पोस्टरबाजी, थेट केले ‘हे’ सवाल
VIDEO | कोल्हापुरातील गोकूळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. गोकुळ सभेच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटातील वातावरण चांगलंच तापल, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या परिसरात महाडिक गटाकडून जोरदार पोस्टरबाजी
कोल्हापूर, १५ सप्टेंबर २०२३ | गोकूळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होतेय. दरम्यान, गोकुळ सभेच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटातील वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकूळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाडिक गटाकडून जोरदार पोस्टरबाजी सभेच्या ठिकाणी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून उत्तर द्या… असे म्हणत महाडिक गटाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यावर दबाव का आणला जातोय? कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून त्यांचे उत्तर मागण्याचा प्रयत्न महाडिक गटाकडून केला जात आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर विरोधक महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करण्यात येत आहे. गोकुळमध्ये गैरकारभार होत असल्याचे आरोपही महाडित यांनी केला आहे. दरम्यान, आजच्या सभेत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.