शरद पवार गटाला भाजप मोठा धक्का देणार? ‘हा’ बडा नेता भाजपात जाण्याच्या हालचाली सुरू
भाजप शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपाच जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे सुपूर्द केल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला यानंतर आता भाजप शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपाच जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार यांना दुसरा कोणता मोठा धक्का बसणार? यासंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशासंदर्भात दिल्ली दरबारी मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता कोण? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
Published on: Feb 19, 2024 03:53 PM