Special Report | जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी 1 गुन्हा, काय आहे प्रकरण?
VIDEO | जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार ? आता कोणत्या प्रकरणी सापडले वादाच्या भोवऱ्यात ?
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आलाय. सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकऱणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पण आपले वक्तव्य मॉर्फ केल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप फेटाळत ओरिजनल व्हिडीओ समोर आणलाय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आधी विनयभंगाचा गुन्हा, नंतर मारहाण केल्याचा गुन्हा आणि आता सिंधी समाजाच्या भावना दुखावल्याचा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ४ कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम १५३ अ – धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे, कलम 153 ब – राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे निवेदन करणे, कलम 295 अ – कोणत्याही वर्गाचा, धर्माचा किंवा धार्मिक श्रध्वांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे आणि कलम 298 – धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे या कलमांखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बघा स्पेशल रिपोर्ट…