कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार
गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी रशियामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी रशियामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कीवमधून पोलंडच्या बॉर्डवर येत असताना या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे.