महिला दिनाच्या दिवशीच महिला प्रवासी रेल्वेवर नाराज, डोंबिवली स्थानकात आंदोलन; काय आहे कारण?

| Updated on: Mar 08, 2023 | 1:22 PM

VIDEO | डोंबिवली रेल्वे स्थानक येथे महिला प्रवाशांचे रेल्वे विरोधात आंदोलन, बघा काय आहेत मागण्या?

मुंबई : महिला प्रवाशांनी रेल्वे विरोधात आंदोलन केल्याचे समोर आले आहे. लोकलचे विस्कळीत वेळापत्रक , त्यामुळे होणारी गर्दी, विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांमुळे होणार त्रास, महिलांसाठी लोकलचे डब्बे कधी वाढणार आणि अनधिकृत फेरीवालांचा बंदोबस्त कधी होणार अशा मागण्या या महिला रेल्वे प्रवाशांच्या असून त्यांनी आजच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे विरोधात आंदोलन केले आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देऊनही त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही, असे या आंदोलक महिला प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानक येथे महिला प्रवाशांनी रेल्वे विरोधात आंदोलन केले आहे.

Published on: Mar 08, 2023 01:22 PM
नवाब मलिक यांना तूर्तास दिलासा नाहीच:न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ
आदित्य ठाकरे यांचं हवाई उड्डाण मंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रासाठी कोणती महत्त्वाची मागणी?