बुद्धीमत्तेला सॅल्यूट ! चिमुकल्याचं अफाट ज्ञान अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली नोदं

| Updated on: May 20, 2023 | 3:05 PM

VIDEO | साडेतीन वर्षीय अनुदीप चव्हाण या चिमुकल्याचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' कडून सन्मान, बघा त्याचं अफाट ज्ञान

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव येथील चिमुकल्या नर्सरी मध्ये शिकणारा हा अवघ्या साडेतीन वर्षाचा असुन यांनी मात्र ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आपले नाव नोंदविले आणि आपल्या आई-वडिलांची मान उंचावली आहे. त्याचं नाव अनुदीप अंकुश चव्हाण असे आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या वडिलांचे मूळ गाव नांदेड जिल्हातील माहूरगड जवळील आमनाडा. वडील बुलढाणा अर्बन बँकेचे गोरेगाव शाखा व्यवथापक आणि आई गृहिणी आहे. अनुदीपने नुकतेच जेमतेम नर्सरी मध्ये प्रवेश घेऊन शाळेत जायला लागला.  वयाच्या दुसऱ्या वर्षी ए ..बी ,…सी… डी आणि अ… आ.. ई… चे धडे गिरवत हा पुढे चालत होता. मात्र त्याची लक्षात ठेवण्याची क्षमता मोठी होती. जेव्हा अनुदीप नर्सरी मध्ये जायला लागला तर इंग्रजी शब्द, स्पेलिंग लक्षात ठेवण्याच्या क्षमता आणि  गुणांची ओळख आई-वडिलांना आणि शिक्षकांना झाली. यातूनच त्याचा प्रवास पुढे वाढत चालत गेला. आज अनुदीप विविध प्रकारच्या जनरल नॉलेज विषयी माहिती सांगतो, देशपातळीवरील राज्य आणि राजधान्या, देशाचे प्रमुख कोण आहेत याच्या विषयी तोंडपाठ माहिती सांगतो आंतरराष्ट्रीय देशांच्या राजधान्या विषयी माहिती सांगतो, एबीसीडी तसेच नावे स्पेलिंग सहीत सांगतो, एक ते शंभर पर्यंत तोंडपाठ  म्हणतो, अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. अवघ्या साडे तीन वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या या कर्तव्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Published on: May 20, 2023 03:05 PM
RBI Bank 2000 Note Ban : दोन हजारची नोट बंद! ठाणेकरांप्रमाणे तुम्ही ही डोकं लढवाच; नोट घ्या अन् येथे जा
सिद्धारमय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ